बिहार-झारखंडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ले

April 22, 2009 5:35 AM0 commentsViews: 2

22 एप्रिलदुसर्‍या टप्प्यातल्या मतदानाच्या एक दिवस आधी बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. नक्षलवाद्यांनी झारखंडमध्ये रेल्वे स्टेशन पेटवलं तर बिहारमध्ये 5 ट्रक जाळले आहेत. निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी बिहार आणि झारखंडमध्ये आज आणि उद्या बंद पुकारला आहे.गुरुवारी देशात 2009 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यातलं मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याकरता नक्षलवाद्यांनी आज सकाळपासूनच हल्ल्यांना सुरुवात केली. बिहारमध्ये एक रिकामी शाळा नक्षलवाद्यंनी उडवून दिली. बिहारच्या गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पाच ट्रक पेटवून दिले, तर व्यक्तीला ठार केलं. याच बिहारमधल्या औरंगाबादमध्ये एक सरकारी कार्यालयाल आगीच्या ज्वाळांमध्ये भस्मसात झालं. झारखंडच्या पलामू शहरात एक रेल्वे स्टेशनला आग लावण्यात आली. त्याचबरोबर लातेहारमध्ये दोनशे नक्षलवाद्यांनी एका पॅसेंजर ट्रेनवर हल्ला करून ती ट्रेन ताब्यात घेतली. बरकान्यावरून मुगुलसराई इथे ही ट्रेन चालली होती. जवळपास 200 नक्षलवाद्यांनी या ट्रेनवर हल्ला केला.त्यामुळे शेषेगहा स्टेशनवर ती ट्रेन थांबवण्यात आली. मात्र काही वेळानंतर नक्षलवाद्यांनी ही ट्रेन सोडून दिली. या ट्रेनमधल्या 75 प्रवाशांना नक्षलवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. काही तासांनी या ट्रेनमधल्या सर्व प्रवाशांना सोडण्यात आलं.

close