तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण

June 28, 2014 8:22 PM0 commentsViews: 437

ज्ञानोबा माऊलींची पालखी नीरा स्नानानंतर लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी आहे. उद्या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल तर आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान बारामतीतून झाल्यानंतर पालखी काटेवाडीत पोहोचली. या ठिकाणी पालखीचं स्वागत पायघड्या घालून करण्यात आलं. महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दुपारच्या विसाव्यानंतर काटेवाडी जवळच तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मेंढ्यांनी गोल प्रदक्षिणा घातली. मेंढ्यांचं रिंगण बघण्यासाठी हजारो वारकर्‍यांनी गर्दी केली होती. आता तुकाराम महाराजांची पालखी सणसर येथे मुक्कामी पोहोचलीय.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close