सत्ता सांभाळण्यास राहुल कमकुवत, दिग्विजय सिंहांचा घरचा अहेर

June 28, 2014 8:57 PM0 commentsViews: 1314

digi_rahul28 जून : लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पानिपतानंतर काँग्रेसचे निष्ठावंत मानल्या जाणार्‍या दिग्विजय सिंह यांनी आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्त्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सत्ता राबवण्याची राहुल गांधींची मनोवृत्ती नाही असं वक्तव्य करुन सिंह यांनी पक्षाला घरचा अहेर दिला. तसंच अन्यायाविरुद्ध राहुल यांची लढण्याची इच्छा आहे. लोकसभेत काँग्रेसचं नेतृत्त्व करताना राहुल गांधींनी एनडीएवर खरपूस टीका करायला हवी होती.

एव्हाना निकालानंतर विरोधीपक्षासाठी कमानही त्यांनी सांभाळायला हवी होती असा सल्ला वजा टोलाही सिंह यांनी लगावला. त्यांच्याबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही टीका केली.

मनमोहन सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत जास्त प्रभावीपणे संवाद साधायला हवा होता पण तसं झालं नाही असा नाराजीचा आसुडही सिंह यांनी ओढला. नेहमी विरोधीपक्षावर विखारी टीका करणारे दिग्विजय सिंह यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close