हिंसाचारविरोधात ‘निर्धार’

June 28, 2014 9:11 PM0 commentsViews: 207

28 जून : काँग्रेसचे खासदार हुसेन दलावाई यांच्या नेतृत्वाखाली खर्डा ते हडपसर असा दोन दिवशीय शांतता मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय एकता मंचाच्या वतीने काढलेल्या या मोर्चात विविध संघटना आणि तरुणांनी सहभाग घेतला. हा ‘हिंसाचारविरोधी निर्धार मोर्चा आज पुणे मार्गे हडपसरला पोहोचलाय. जातीयवादाचा बळी ठरलेल्या नितीन आगेच्या खर्डा गावातून हा मोर्चा काल निघाला होता. धर्मांधतेचा बळी ठरलेल्या मोहसीन शेखच्या हडपसरमधल्या घरावजवळ आज या मोर्चाचा समारोप झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close