विधानसभेसाठी काँग्रेसची विभाग’वॉर’टीम तयार !

June 28, 2014 9:29 PM0 commentsViews: 1827

prthviraj and manikrao28 जून : लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या दारुण पराभवावर विचारमंथन करण्यासाठी आज दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीत पराभवाचं खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे याच्यांवर फोडण्यात आलंय. त्याबरोबर मिळून सारे लढू असा नारा या बैठकीत देण्यात आला. त्यानुसार राज्यात विभागानुसार टीम तयार करण्यात आल्या असून जबाबदारी वाटण्यात आलीय.

नवी दिल्लीत अँटनी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार अशोक चव्हाण, नारायण राणे, जनार्दन चांदूरकर आणि संजय निरुपम हजर होते. नारायण राणे यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनी थेट पराभवाचा पाढाच वाचला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही, असा सूरच नेत्यांनी लगावलात. तर माणिकरावांनी संघटनेच्या पातळीवर आम्हाला फारशी ताकद दिली नाही अशी तक्रार नेत्यांनी केली. पण झालं ते झालं आता विधानसभेच्या कामाला लागा असा आदेश हायकमांडने दिला.

विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

विधानसभेसाठी काँग्रेसची विभागवार समिती तयार करण्यात येणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात समिती नेमण्यात येणार आहे. 8 सदस्यांची ही समिती असेल, तर समितीतला एक सदस्य दिल्लीचा असेल. ही समिती नेमून दिलेल्या मतदारसंघात करणार काम करेल. सभा, प्रचारदौरे, सोशल नेटवर्किंगवर भर देण्यात येणार आहे. ही समिती शासनानं राबवलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवेल. पश्चिम महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, कोकणात नारायण राणेंवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. विदर्भात विलास मुत्तेमवार, शिवाजीराव मोघे, मुकुल वासनिकांवर जबाबदारी देण्यात आलीय. मराठवाड्यात अशोक चव्हाण, राजीव सातव, अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close