चिलीला शूट’आऊट’ करून ब्राझील क्वार्टर फायनलमध्ये

June 29, 2014 12:43 PM0 commentsViews: 583

Brazil wins29  जून : फुटबॉल वर्ल्ड कपच्या पहिल्या नॉकआऊट मॅचमध्ये ब्राझीलनं चिलीवर विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीवर 3-2 नं मात करून ब्राझीलने हे यश मिळवलं आहे. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोघांचेही 1-1 गोल झाले होते, एक्स्ट्रा टाइमनंतर मॅचचा निकाल लागला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलच्या डेव्हिड लुईस, मार्सेलो आणि नेमार यांनी गोल केले तर चिलीकडून अँरनगुईज आणि डियाज यांनी गोल केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेमारने केलेला गोल ब्राझीलसाठी विजयी ठरला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close