प्रभाकरनला पकडण्यासाठी श्रीलंकन लष्कर सज्ज

April 22, 2009 8:57 AM0 commentsViews: 2

22 एप्रिल, कोलंबो लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम ( एलटीटीई ) म्हणजे लिट्टे प्रमुख प्रभाकरनला पकडण्यासाठी श्रीलंकन लष्कराने अंतिम चढाईला सुरुवात केली आहे. काल दुपारपर्यंत प्रभाकरन आणि त्याच्या साथीदारांना शरण येण्याची मुदत श्रीलंकन लष्काराने दिली होती. पण आता ती संपली आहे. त्यामुळे श्रीलंकन लष्कारानं प्रभाकरनला पकडण्यासाठी कंबर कसली आहे. एलटीटीईच्या ताब्यातल्या भागातून आतापर्यंत 77 हजार लोकांना हलवण्यात आलं आहे. लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन, नागरिकांमध्ये लपला असल्याचं सांगण्यात येतंय. पण आतापर्यंत श्रीलंकेच्या लष्कराला प्रभाकरनचा पत्ता लागलेला नाही. प्रभाकरन बोटीतून पळून जाण्याची शक्यता श्रीलंकन लष्करानं व्यक्त केलीये.अजूनही लिट्टेचे 300 ते 400 बंडखोर त्या भागात असल्याचं सांगण्यात येतंय. प्रभाकरनला शरण येण्यासाठी दिलेली मुदत काल दुपारी संपली. त्यानंतर श्रीलंकन लष्करानं जोरदार चढाई सुरू केलीये.

close