पक्षश्रेष्ठींचा विश्वास कायम राखण्यात मुख्यमंत्र्यांना यश

June 29, 2014 4:23 PM0 commentsViews: 709

prithvirah

29  जून :  काँग्रेस हायकमांडचा आपल्यावरचा विश्वास कायम राखण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यश आलं आहे. काल अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याची मागणी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडे केली होती, पण लोकसभेत जे झालं ती वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींसमोर मांडतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांना आपण कशी मदत केली याचा लेखाजोखाही सादर केला.

एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठीचा कृती आराखडाही त्यांनी अँटोनी कमिटीसमोर सादर केला. राष्ट्रवादीसोबत आघाडीची बोलणी तात्काळ सुरू करावी. जागावाटप आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया 31 जुलैच्या आत पूर्ण करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदल आणि विस्तार आणि काही महत्त्वाच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात , अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एकूणच, विधानसभा तरी हातची जाऊ नये यावर लक्ष ठेवून आता काँग्रेस तयारीला लागलीय हे स्पष्ट होतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close