वरूण गांधी पिलिभीतमधून भरणार उमेदवारी अर्ज

April 22, 2009 9:01 AM0 commentsViews: 1

22 एप्रिल, पिलिभीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे युवा उमेदवार वरूण गांधी आज पिलिभीतमधून लोकसभा निवडणूक 2009 साठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी वरूण यांची आई मनेका गांधी यांच्यासह भाजपचे काही दिग्गज ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. वरूण गांधी यांची 16 एप्रिलला पॅरोलवर सुटका झाली. वरूण दोन आठवड्यांच्या पॅरोलवर सुटून आले आहेत.प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी वरूण गांधींवर उत्तरप्रदेश सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली होती. वरूण गांधींना उमेदवारी देऊ नये असा सल्ला निवडणूक आयोगानं भाजपला दिला होता. पण भाजपनं हा सल्ला फेटाळत वरूण गांधींना उमेदवारी दिली आहे.

close