फिफा वर्ल्ड कप : मेक्सिकोचा पराभव करून नेदरलँड क्वार्टर फायनलमध्ये

June 30, 2014 10:25 AM0 commentsViews: 336

nethierland and mexico30  जून : फिफा वर्ल्ड कपमध्ये काल नेदरलँडने मेक्सिकोला हरवलं आहे. नेदरलँडने 2-1ने मेक्सिकोवर धक्कादायक विजय मिळवला आहे. नेदरलँड आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे

खरंतर नेदरलँडसमोर बलाढ्य मेक्सिकोचं आव्हान होतं. मॅचच्या पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही पण सेकंड हाफमध्ये मेक्सिकोने आधी गोल नोंदवत आघाडी घेतली. त्यानंतर 88व्या मिनिटाला वेस्ली स्नायडरने केलेल्या गोलमुळे नेदरलँडने मेक्सिकोसोबत बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी किकचा फायदा घेत नेदरलँडने दुसरा गोल केला आणि निर्णायक आघाडी घेतली. आता नेदरलँडची टीम या फिफा वर्ल्ड कपच्या शेवटच्या 8 टीम्समध्ये पोहोचली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close