रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराची चौकशी व्हावी – विनोद तावडे

June 30, 2014 10:25 AM0 commentsViews: 852

`1tawade30   जून :  गणपतीसाठी कोकणात जाणार्‍या रेल्वेचं आरक्षण सुरु होताच काही सेकंदातच 300 वर वेटिंग लिस्ट गेली. या सर्व प्रकरणामागे रेल्वे तिकीट दलालांचा हात आहे का याबद्दलची चौकशी करावी अशा मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चाकरमान्यांनी मुंबईतल्या वीस रेल्वे स्टेशनवर गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वे तिकीटांसाठी रांगा लावल्या होत्या पण काल रेल्वेचं बुकिंग सुरु होताच रांगेतल्या पहिल्चा प्रवाशाला चक्क वेटिंग लिस्टवर दोनशेवा नंबर असल्याचं तिकीट मिळालं. बुकिंग सुरु होताच वेटिंग कसं? ही तिकीटं आधीच दलालांनी विकत घेतली का? या मागे रेल्वे कर्मचार्‍यांचा हात आहे का? या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी तावडे यांनी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close