प्रकाश झा यांच्या कार्यालयातून 10 लाख रुपयांची रोकड जप्त

April 22, 2009 7:05 AM0 commentsViews: 3

22 एप्रिल, पश्चिम चंपारणलोकजनशक्ती पार्टीचे पश्चिम चंपारणचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध फिल्म डायरेक्टर प्रकाश झा यांच्या ऑफिसमधून दहा लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. आज बिहार पोलिसांनी प्रकाश झा यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यामुळे उद्या बिहारमध्ये निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यांत होणारं मतदान पाहता पोलिसांच्या धाडीमुळे प्रकाश झा अडचणीत सापडणार आहेत. बिहार पोलिसांनी या प्रकरणी 35 जणांना ताब्यातही घेतलं आहे. निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातलं मतदान उद्या होत आहे. आणि त्यामध्ये प्रकाश झा यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या धाडीविषयी प्रकाश झा यांना विचारलं असता राज्यसरकार आमच्या पार्टीला जाणूनबुजून त्रास देत असल्याचा दावा त्यांनी केला.

close