पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण, वॉचमन सज्जाद पठाण दोषी

June 30, 2014 2:00 PM0 commentsViews: 808

pallavi murder case30   जून :   मुंबईतल्या पल्लवी पुरकायस्थच्या हत्या प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाने आरोपी सज्जाद पठाणला दोषी ठरवलं आहे. खून, विनयभंग आणि बेकायदेशीररित्या घरात शिरल्याबद्दल सज्जाद पठाणला दोषी ठरवण्यात आलंय. आता 3 जुलैला त्याला देण्यात येणार्‍या शिक्षेवर युक्तिवाद होणार आहे.
 
9 ऑगस्ट 2012ला मुंबईतल्या वडाळा इथे तिची राहत्या घरी हत्या झाली होती. महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण म्हणून हे प्रकरण त्यावेळी खूप गाजलं होतं. यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. मुंबई पोलीस सहाय्यक आयुक्त हिमांशू रॉय यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वॉचमनला आरोपी ठरवण्याचा आमचा निर्णय आणि तपासाची दिशा योग्य असल्याचं सिद्ध झाल्याचं रॉय यांनी म्हटलं. तर मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर आपण समाधानी असल्याचं पल्लवीच्या आई-वडिलांनी म्हटलं असून पठाणला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पल्लवीच्या आईवडिलांनी केली आहे.

पाहूयात हे हत्या प्रकरण काय आहे…

 • 9 ऑगस्ट 2012 रोजी वकील असलेल्या 25 वर्षांच्या पल्लवीची हत्या
 • इमारतीचा वॉचमन सज्जाद अहमद पठाणवर हत्येचा आरोप
 • पल्लवीवर वॉचमन सातत्यानं नजर ठेवून असायचा
 • त्याबद्दल एकदा पल्लवीनं ओरडल्याचा राग सज्जादनं मनात ठेवला
 • सूड घेण्याच्या उद्देशानं पल्लवीवर बलात्कार करण्याची होती योजना
 • हत्येच्या रात्री सज्जादनं वारंवार तिच्या फ्लॅटची लाईट घालवली
 • मदतीसाठी बोलावल्यावर वॉचमन इलेक्ट्रीशियन घेऊन आला, मात्र त्याचवेळी घराची किल्ली त्यानं पळवली
 • काही वेळानं पुन्हा तो सुरा घेऊन फ्लॅटमध्ये शिरला
 • पल्लवी गाढ झोपलेली असताना वॉचमननं बलात्काराचा प्रयत्न केला
 • मात्र पल्लवीनं प्रचंड प्रतिकार केला, तेव्हा राग येऊन वॉचमननं तिचा खून केला
 • दुसर्‍या दिवशी पल्लवीचा प्रियकर अविक सेनगुप्ताला तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close