बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्स आमने-सामने

April 22, 2009 9:16 AM0 commentsViews: 6

22 एप्रिल, केपटाऊन आयपीएलच्या आजच्या दिवशी राहुल द्रविडची बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्स आमने-सामने येतील. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं दोन मॅचपैकी एका मॅचमध्ये विजय मिळवलाय तर एका मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सविरुध्द बंगलोरनं विजयी कामगिरी केली होती. पण चेन्नई सुपर किंग्जविरूध्द त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे कॅप्टन केविन पीटरसन, राहुल द्रविड, रॉबिन उत्थप्पा, जॅक कॅलिस, रॉस टेलर आणि अनिल कुंबळे या प्रमुख खेळाडूंना पुन्हा आपली कामिगरी उंचवावी लागणार आहे. दुसरीकडे डेक्कन चार्जर्सची ही दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल 8 विकेटनं पराभव केला होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामातला पराभव विसरून ही टीम पुन्हा एकदा चार्ज झाली आहे. ऍडम गिलख्रिस्ट, हर्षेल गिब्ज, व्ही व्ही एस लक्ष्मण, रोहित शर्मा आणि स्कॉट स्टाईरिस असे तगडे खेळाडू या टीममध्ये आहेत. त्यामुळे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि डेक्कन चार्जर्समधली ही मॅच चांगली चुरशीची होणार असंच दिसतं आहे.

close