प्रणिती शिंदेंचं न्यायभवनासमोर आंदोलन

June 30, 2014 4:35 PM0 commentsViews: 2173

30 जून : जातपडताळणी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणार्‍या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडुन मिळणार्‍या अनेक सवलतींपासून वंचित राहावं लागतं. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापूरच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आता रस्त्यावर उतरल्या आहेत. ओबसी, एसटी आणि एससीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्याने होणार्‍या त्रासाच्या विरोधात प्रणिती शिंदे यांनी आज (सोमवारी) सोलापूरच्या न्यायभवनासमोर आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आंदोलन करण्याची वेळ येत असल्याचं चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close