या बाब्बो, खरंच लागलं गाढवाचं लग्न !

June 30, 2014 8:40 PM0 commentsViews: 900

30 जून : जून महिना संपत आला तरी वरुणराजाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झालेल्या नागरिकांनी मिरजेत पावसासाठी गाढवाचे लग्न लावले. मिरजेतील
तोडकर मळा परिसरात वरुणराजाला खूश करण्यासाठी गाढवांचा विधिवत लग्न समारंभ पार पडला.वाजंत्रीसह गाढवांची वरातही काढण्यात आली.पावसा
साठी येथील नागरिकांनी या पूर्वी २००२ या वर्षीही गाढवाच्या लग्नाचा प्रयोग केला होता.

एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर पावसाला आळवणी करण्यासाठी बेडकाचे किंवा गाढवाचे लग्न लावतात. कित्येक वर्षी हि लोकप्रथा सुरु आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्याने सांगली जिल्ह्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही. खरिपाची पेरणी केलेले शेतकरी पीक वाळून जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. पाऊस पडला नाही तर पुढील सर्वच पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. तोडकर मळा परिसरात अशाच चिंताग्रस्त शेतकर्‍यांनी वरुण राजाला खूश करण्यासाठी गाढवाचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

सकाळ पासूनच परिसरातील नागरिकांची लग्नसोहळ्याची गडबड सुरु होती. सर्व साहित्याची जमवा जमव झाल्यानंतर गाढव वर-वधू यांना मंडपात आणण्यात आले. विधिवत लग्न सोहळा उरकून वरुणराजाला बरसण्यासाठी साकडे घालण्यात आले. नागरिकांनी वाजंत्रीसह वर – वधूची वरातही काढली. लग्न सोहळा पाहण्या साठी शहर आणि परिसरातील लहान थोरांसह महिलांनीही मोठी गर्दी केली होती. लग्न लावण्यात आलेल्या नव दाम्पत्याला आशीर्वाद देतानाच पाऊस पडूदे अशी इच्छाही उपस्थितांनी व्यक्त केली. गाढवांच्या लग्नाबद्दल परिसरात कुतूहल निर्माण झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close