फ्रान्स-नायजेरियात महामुकाबला

June 30, 2014 7:27 PM0 commentsViews: 16

france vs nigeria30 जून : फुटबॉलचा ज्वर आता शिगेला पोहचला आहे. आज माजी वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स त्यांच्या राऊंड ऑफ 16 च्या मॅचसाठी सज्ज झाले आहेत. आज त्यांचा मुकाबला आहे तो धक्कादायक कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या टीमशी. या मॅचमध्ये युरोपातील जायंट फ्रान्सला आव्हान आहे ते आफ्रिकेतील नायजेरियाचं. ब्राझिलियाच्या स्टेडिओ नॅशनलवर भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता ही मॅच रंगेल.

या संपूर्ण स्पर्धेत फ्रान्सनं चांगली कामगिरी केली आहे. एकिकडे युरोपियन जायंट्स या वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप होत असताना फ्रान्सनं सातत्यपूर्ण कामगिरी केलीये. ग्रुप स्टेजमध्ये दोन विजय आणि एका ड्रॉसह फ्रान्सनं विजयी कामगिरी केली आहे. तर नायजेरियानंही आपल्या ग्रुपमध्ये दुसरं स्थान पटकावलंय.

पण फ्रान्सचा धडाका ते रोखू शकणार का हा मोठा प्रश्नच आहे. फ्रान्ससाठी बेंझेमाचा धडाका जवळपास प्रत्येक मॅचमध्ये बघायला मिळाला. इतकच नाही तर फ्रान्सच्या टीमनं आक्रमण आणि डिफेन्सचा उत्तम खेळ केला आहे. त्यामुळे नायजेरियाला हे आव्हान नक्कीच जड जाणार आहे.

फ्रान्सचा प्रवास

  • - हॉण्डुरासचा उडवला 3-0 नं धुव्वा
  • - स्वित्झर्लंडचा उडवला 5-2 नं धुव्वा
  • - इक्वेडोरविरुद्ध मॅच ड्रॉ

नायजेरियाचा प्रवास

  • - इराणविरुद्ध मॅच ड्रॉ
  • - बोस्नियाचा केला 1-0 नं पराभव
  • - अर्जेंटिनाकडून 3-2 नं पराभव

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close