अब्बास काझमींना मिळाली 10 दिवसांची मुदत

April 22, 2009 11:48 AM0 commentsViews: 2

22 एप्रिल, मुंबई 26/11 च्या हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या केसचा अभ्यास करण्यासाठी आर्थर रोड स्पेशल कोर्टाने अब्बास काझमी यांना 10 दिवसांची मुदत दिली आहे. कसाबच्या वकिलांनी बुधवारी आर्थररोड स्पेशल कोर्टात केसचा अभ्यास करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली होती. पण ती कोर्टानं फोटाळून लावली. आता 26/11 च्या खटल्याची पुढची सुनावणी 2 मेपर्यंत पुढे ढकलली आहे. 2 मे पासून विशेष न्यायालयात 26/11 च्या खटल्याच्या नियमित सुनावाणीला सुरुवात होणार आहे. 26/11 च्या खटल्याच्या सुनावणीचा आजचा सातवा दिवस होता. आर्थररोड स्पेशल कोर्टाचं कामकाज चालतं ते मराठी आणि इंग्रजीतून. त्यामुळे त्याच्यावरचं हजारांपेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र कसाबला उर्दूतून जाणून घ्यायची मागणी कसाबनं केली होती. पण ती कोर्टानं फेटाळून लावत आरोपत्राशी संबंधित कागदपत्रं उर्दू भाषेतून भाषांतरित करून मिळणार नाहीत, असं आर्थररोड स्पेशल कोर्टानं सांगितलं. कामकाजाचा बराच वेळ वाया जाणार असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे कोर्टानं त्याची मागणी फेटाळून लावली. कसाबचं वय आणि त्याचा खटला बाल गुन्हेगारांच्या कोर्टात चालवण्याच्या मागणीच्या अर्जावर उद्या निर्णय होणार आहे.

close