मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षांचा फैसला राहुल गांधींच्या हाती ?

June 30, 2014 10:14 PM0 commentsViews: 832

rahul_cm_manikrao30 जून : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या नेतृत्त्वबदलाची अनिश्चितता किमान आठवडाभर तरी कायम राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या भविष्याबाबतचा फैसला आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत अशी सूत्रांची माहिती आयबीएन लोकमतला मिळालीये.

ए.के.ऍटोनी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच राहुल गांधी महारा़ष्ट्र, आसाम आणि हरियाणामधल्या पक्षांतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांना राहुल गांधींसमोरसुद्धा आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे.

सोनिया गांधी येत्या दोन दिवसात भारतात परतील त्यांनंतर ए .के. ऍटोनी कमिटी आपला रिपोर्ट त्यांना सादर करेल. त्यावेळेस आगामी विधानसभा महाराष्ट्रात निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात , प्रदेशाध्यक्ष कोण असेल, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदलावा का यासंदर्भातले निर्णयदेखील याच वेळी घेतले जाणार असल्याचं कळतंय.

दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी हायकमांडची मर्जी राखण्यात यश मिळवलंय. पण आता चेंडू राहुल गांधी यांच्या कोर्टात टोलवल्यामुळे काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close