तृणमूलच्या नेत्याची जीभ घसरली, बलात्काराची दिली धमकी

July 1, 2014 1:22 PM0 commentsViews: 789

247004-tapas-pal-rna01  जुलै :  तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पॉल यांनी भर रॅलीत बोलताना मुक्ताफळं उधळली आहेत. ‘आपल्याला आव्हान देणार्‍या कोणाही व्यक्तीला सोडणार नाही, त्यांच्या आया-बहिणींवर बलात्कार घडवून आणेन अशी धमकी भर रॅलीत दिली. या वादग्रस्तविधानामुळे पॉल यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरु झाल्यावर तपास यांची पत्नी नंदिनी पॉल यांनी माफी मागिताली आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते तपस पॉल यांनी पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना ही धमकी भर रॅलीत दिली. या प्रकरणी पॉल यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर ‘आपण ‘रेप’ हा शब्द वापरला नसून ‘रेड ‘ हा शब्द वापरला होता’ असं पॉल यांचं म्हणणं आहे. या पर्श्वभूमीवर पाल यांच्या पत्नीनं मात्र याबाबत माफी मागितली असून पाल यांच्या बोलण्यामागचा हेतू वेगळा होता असं म्हटलं आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस पक्षाने पॉल यांना 48 तासांत स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे. तर माकपच्या कार्यकर्त्यांनी पॉल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close