गुडबाय ऑर्कुट !

July 1, 2014 10:01 AM0 commentsViews: 3543

orkur
01   जुलै :  भारतामध्ये सगळ्यांना सोशल नेटवर्किंगची ओळख करून देणारी ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग वेबसाईट बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतलाय. 30 सप्टेंबरला ऑर्कुट बंद होईल. सोशल मीडियामध्ये आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न गुगल गेली अनेक वर्षं करतंय पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. 2004मध्ये सुरुवात झालेल्या ऑर्कुटला ब्राझील आणि भारत वगळता जगात इतरत्र मात्र आपली छाप पाडता आली नाही. ऑर्कुट पाठोपाठ जवळपास महिनाभरात लाँच झालेल्या फेसबुकनेमात्र जग काबीज केलं. ऑर्कुट बंद करून आता गुगल आपलं सगळं लक्ष यु ट्यूब आणि गुगल प्लसवर केंदि्रत करणार आहे. जर ऑर्कुटवर तुमचे काही फोटोज असतील तर ते तुम्हाला गुगल प्लसवर ट्रान्सफर करता येतील. शिवाय स्क्रॅप्स आणि इतर महत्त्वाच्या पोस्ट्सचा बॅकअपही घेता येईल.

त्यासाठी ही लिंक चेक करा https://support.google.com/orkut/answer/6033100?p=orkut&hl=en&rd=1

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close