पुन्हा जेलमध्ये जायला घाबरत नाही – वरूण गांधींचा इशारा

April 22, 2009 11:52 AM0 commentsViews: 1

22 एप्रिल, पिलिभीत वेळ पडली तर मी पुन्हा जेलमध्ये जाईन. जेलमध्ये जायला मी घाबरत नाही, असा इशारा वरूण गांधी यांनी पिलिभीतमध्ये दिला. आज वरूण गांधींनी पिलिभीतमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्या समर्थकांना उद्देशून भाषण केलं. आज वरूण गांधी यांच्यासोबत त्यांची आई मनेका गांधी आणि भाजपचे काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. पिलिभीतमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असं भाषाणात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे तरूण युवा उमेदवार वरूण गांधींना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच रासुका आंतर्गत उत्तरपदेश सरकारनं कारवाई केली होती. वरूण गांधींना उमेदवारी देऊ नये असा सल्ला निवडणूक आयोगानं भाजपला दिला होता. पण भाजपनं हा सल्ला फेटाळत वरुण गांधींना उमेदवारी दिलीये. जेलमधून सुटल्यानंतर आज पहिल्यांदा वरुण गांधींनी जाहीर भाषण केलं. जुनाच जोश त्यांच्या भाषणात आज दिसला.

close