जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच, ‘स्वाभिमानी’ला हव्यात 65 जागा !

July 1, 2014 3:49 PM0 commentsViews: 3566

mahyuti01 जुलै : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीला आता विधानसभेचे वेध लागले आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसलीय. मात्र जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे.

सेना-भाजपचा समझोता होण्याआधीच युतीतल्या इतर मित्रपक्षांची जागांची मागणी वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी 65 जागांची तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांची 30 ते 35 जागांची मागणी केली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी 25 जागांची मागणी केली आहे. भाजपनंही जास्त जागांसाठी आग्रह धरला आहे. या वेळेस भाजपला 119 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. या मागण्यांमुळे शिवसेनेच्या जागा 169 पेक्षा कमी होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जागावाटपाबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत आपल्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close