लिट्टेचे दोन मोठे नेते शरण : श्रीलंकन लष्कराचा दावा

April 22, 2009 12:31 PM0 commentsViews: 2

22 एप्रिल, श्रीलंकालिट्टेचे दोन मोठे नेते शरण आल्याचा दावा श्रीलंकन लष्कराने केला आहे. लिट्टेचा मीडिया इन्चार्ज आणि एका ट्रान्सलेटरने स्वतःला लष्कराच्या हवाली केलं आहे. लिट्टेच्या दोन मोठ्या नेत्यांनी स्विकारलेली शरणागती पाहता श्रीलंकन लष्करानं लिट्टेविरोधात कारवाई तीव्र केल्याचं दिसून येत आहे. लिट्टेच्या ताब्यात असणार्‍या प्रदेशातून एक लाख लोकांना बाहेर काढण्यात येतंय. गेल्या दोन दिवसांत जवळपास 95 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. लिट्टेप्रमुख प्रभाकरनचा मात्र अजून सुगावा लागलेला नाही. किनारपट्टीवरच्या आठ किलोमीटरच्या भागात प्रभाकरन लपला असल्याचा संशय आहे. या भागात अजूनही 300-400 लिट्टे बंडखोर असण्याची शक्यता आहे. दरम्यान लिट्टेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखासह काही मोठे नेते पळून गेल्याचं सूत्रांकडून कळलं आहे. दरम्यान श्रीलंकेत लिट्टेविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईविरोधात तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी उद्या गुरुवारी 12 तासांचा बंद पुकारला आहे.

close