डॉक्टर संपावर, रुग्ण वार्‍यावर !

July 1, 2014 6:36 PM1 commentViews: 550

01 जुलै : आज देशभरात डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. पण राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांनी म्हणजेच गॅझेटेड डॉक्टर्सनी संप पुकारल्यामुळे रुग्णाचे अतोनात हाल होत आहे. मुंबईतील आझाद मैदानात डॉक्टरांचं धरणं आंदोलन सुरू केलंय. या डॉक्टर्सनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रश्न प्रलंबित असल्याने हे आंदोलन करण्यात येतंय. राज्यभरातील तब्बल 12 हजार डॉक्टर संपावर असल्याची माहिती डॉक्टरांच्या संघटनेनं दिलीय.

नाशिकमध्ये 450 डॉक्टर संपावर

नाशिकमधल्या साडेचारशे वैद्यकीय अधिकार्‍यांनी शासकीय रुग्णालयासमोर निदर्शनं केली. मॅग्मा संघटनेच्या कामबंद आंदोलनात हे सारे मेडिकल ऑफिसर्स सहभागी झाले आहेत. आश्वासनं देऊनही मागण्या पूर्ण न करणार्‍या सरकारचा यावेळी डॉक्टर्सनी निषेध केला. यामध्ये नाशिक जिल्हा सिव्हील हॉस्पिटल, जिल्ह्यातली इतर ग्रामीण रुग्णालयं, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.

ठाण्यात रुग्णांचे हाल

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये सध्या भयावह चित्र पहायला मिळतंय. विशेषत: वृद्ध आणि लहान मुलं यांचे फार हाल होत आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दुर्गम भागांतून लोक येत असतात. अशा रुग्णांना या संपाबद्दल काहीच कल्पना नव्हती. आता या रुग्णांना एकतर खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे किवा हा संप संपायची वाट पाहावी लागणार आहे.

ग्रामीण भागात रुग्ण वार्‍यावर

डॉक्टर्सनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं ग्रामीण-आदिवासी भागातील रुग्णांचे हाल सुरू आहे. ग्रामीण भागातले गरीब रुग्ण सरकारी दवाखान्यांवरच अवलंबून आहेत. नंदुरबारचं शासकीय रुग्णालय त्यापैकीच एक. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून, खेडोपाडातून आलेल्या रुग्णांचे आज चांगलेच हाल झाले. डॉक्टर्सच्या संपाची माहिती नसल्याने आणि माहिती झाली तरी उपचारासाठी दुसरा पर्याय नसल्याने शासकीय रुग्णालयामध्ये आलेले रुग्ण उपचाराआभावी खोळंबले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Umesh P

    Like Police cannot go on strike. The same Law should be made applicable for Doctor’s .

close