पबमध्ये मुलींनी स्कर्टमध्ये जाऊ नये, भाजप नेत्याची मागणी

July 1, 2014 7:37 PM3 commentsViews: 3660

gova_sudin_dhavlikar01 जुलै : एकीकडे भाजप सरकार महागाई कशी रोखावी या यक्षप्रश्नाने ग्रासली आहे पण दुसरीकडे भाजपचे नेते वादग्रस्त व्यक्तव्य करुन पक्षाची आणखी डोकेदुखी वाढवत आहे. डॉ.हर्ष वर्धन यांच्यानंतर आता गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी मुक्ताफळं उधळलीय.

ढवळीकर यांनी श्रीराम सेनेच्या विचारसरणीला समर्थन देत, पब संस्कृती बंद झाली पाहिजे, तसंच मुलींनी तोकड्या कपड्यात फिरू नये, असं वक्तव्य करुन खळबळ उडवलीय. ‘पबमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये जाणार्‍या महिला ही भारतीय संस्कृती नाही’ असं शेराही ढवळीकर यांनी दिला.

हे वक्तव्य करून ढवळीकर थांबले नाहीत तर ते गोव्यातील पबसंस्कृती थांबवण्यासाठी राज्य सरकारद्वारे प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर गोव्यात दारुबंदी करावी, अशीही मागणी त्यांनी केलीय.

यावर, ढवळीकर यांचं हे वैयक्तिक मत आहे, हे सरकारचं मत नाही, असं स्पष्ट करत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हात झटकले. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी ढवळीकरांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना एक स्कर्ट पाठवला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • VIPUL

    लवकर IBN Lokmat, जयकांत शिक्रे is waiting

  • Devendrasing Deore

    अगदी बरोबर आहे.

  • Devendrasing Deore

    पुरुश्याने कपडे काढून किंवा अर्ध नग्न फिरले तर चालेल का?

close