बीडमध्ये चिमरुडीची निर्घृण हत्या,नरबळीचा संशय

July 1, 2014 10:07 PM0 commentsViews: 1890

gevrai_muder01 जुलै : बीड जिल्ह्यात गेवराई इथं एका 7 वर्षांच्या मुलीचा अत्यंत निर्घुंणपणे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडलीय. ईशा मौर्या असं या चिमुरडीचं नाव आहे. तिचा मृतदेह डोकं आणि धड वेगळं अशा अवस्थेत सापडला. इशाचा मृतदेह पुरून ठेवला होता. तिच्या अंगावर चटक्यांच्या खुणा दिसून येत आहेत. हा नरबळी असल्याचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे.

पण पोलिसांनी मात्र साफ इन्कार केला आहे. या खुनाचा पोलीस सर्व बाजूनी तपास करीत असल्याचं पोलीस अधीक्षक मंडलीक यांनी सांगितलं. या घटनेनी मात्र जिल्ह्यात चांगलाच भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

ईशा शनिवारपासून बेपत्ता होती. संध्याकाळी तिचा मृतदेह अशा अवस्थेत सापडला. हा नरबळी असल्याचा संशय मुलीचे वडील बाबुराव मोर्या यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, गेवराई येथील लहान मुलीच्या हत्येची घटना खूप विदारक असून याचा पोलीस सर्व बाजूनी तपास करीत असल्याच पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close