काळा पैसा भारतात आणण्यासाठी राम जेठमलानी प्रयत्न करणार

April 22, 2009 1:38 PM0 commentsViews: 7

22 एप्रिल, मुंबई परदेशातल्या स्वीस बँकांमध्ये ठेवण्यात आलेला काळा पैसा भारतात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, यासाठी कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 4 मेला सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं याबद्दलची कारवाई सुरू केलीये आणि यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र 48 तासांत सादर करणार असल्याचं कोर्टाला सांगितलं.परदेशातला काळा पैसा भारतात आणण्यासाठी भाजपनं टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्या संदर्भातली पत्रकारपरिषद 17 एप्रिलला मुंबईत झाली होती. त्या टास्क फोर्समध्ये महेश जेठमलानी, एस. गुरूमूर्ती , अजित डोव्हल (माजी आयबी चीफ ), आर. विद्यानाथन (आयआयएम बंगलोर) यांचा समावेश आहे.

close