सरन्यायाधीश मोदी सरकारवर बरसले

July 1, 2014 10:58 PM1 commentViews: 7755

lodha_on_modi_sarkar01 जुलै : सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी आज (सोमवारी) केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती यांच्या नेमणुकीमध्ये ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांची फाईल केंद्रानं परस्पर वेगळी काढली. त्यासाठी सरन्यायाधीशांशी सल्लामसलतही केली नाही, असं लोढा यांनी स्पष्ट केलं.

सुब्रमण्यम यांची फाईल वेगळी काढली, हे ऐकून धक्काच बसला, ही बातमी उघड केल्यामुळे सरन्यायाधीशांनी सुब्रमण्यम यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असंही सरन्यायाधीशांनी सुनावले. न्यायाधीश बी. एस चव्हाण यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी हे मत व्यक्त केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • अमोलराजे माने

    प्रश्न न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्राचा आहे कि सर न्याधीशांच्या चापलुसी चा? सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची निवड कोणत्या निकषांवर केली जाते हे देखील त्यांनी स्पष्ठ करावं.

close