सोनिया गांधींनंतर आता आयकर खात्याची काँग्रेसला नोटीस

July 1, 2014 11:12 PM1 commentViews: 2695

767sonia_gandhi1 जुलै : लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आता काँग्रेसवर वेगळेच संकट घोंघावत आहे. अगोदर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यानंतर आता पक्षच अडचणीत आलाय. हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना समन्स बजावल्यानंतर काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.

काँग्रेसला आयकरातून सूट का देण्यात यावी अशी विचारणा या नोटिसमध्ये करण्यात आली. या नोटिसला उत्तर देण्यात येईल असं काँग्रेसने स्पष्ट केलंय. पण भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पक्षाने उपलब्ध फंडाचा वापर व्यावसायिक कारणासाठी केल्याचा आरोप काँग्रेसवर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Devendrasing Deore

    काँग्रेस ला सूट कश्याला हवी. त्यामद्धे कोणती सुढ बुद्धी आहे?

close