बेल्जियमने केला अमेरिकेचा 2-1ने पराभव

July 2, 2014 12:29 PM0 commentsViews: 345

debryune_belgium02  जुलै :  साल्वाडोरमध्ये झालेल्या मॅचमध्ये बेल्जियमने अमेरिकेचा 2-1ने पराभव केला. दोन्ही टीममध्ये अतिशय काट्याची टक्कर झाल्याने खेळाच्या पहिल्या 90 मिनिटांत एकही गोल झाला नाही. त्यामुळे एक्स्ट्रा टाईम खेळवण्यात आला आणि यामध्ये बेल्जियमने 2 गोल्सची आघाडी घेतली.

मॅचच्या 93 व्या मिनिटाला बेल्जियमच्या डी ब्य्रुयने याने गोल नोंदवत टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 105 व्या मिनिटाला लुकाकूने दुसरा गोल करत बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केली. अमेरिकन टीम हताश वाटत असतानाचा ज्यूलियन ग्रीनने गोल नोंदवला. पण आणखीन एक गोल करून अमेरिकला बरोबरी साधण्यात अपयश आल्याने बेल्जियमचे क्वार्टर फायनल्सचे स्थान पक्के झाले. 1986 नंतर पहिल्यांदाच बेल्जियन टीम फिफा वर्ल्डकपच्या क्वार्टर फायनल्सपर्यंत पोहोचली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close