आगरी नाटक ‘प्यार किया तो डरना क्या’ लवकरच रंगभूमीवर

April 22, 2009 3:00 PM0 commentsViews: 44

22 एप्रिल अजय परचुरे मराठी रंगभूमीवर आगरी भाषेतलं नवं कोरं 'प्यार किया तो डरना क्या' हे आगळंवेगळं नाटक येत आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे बादशहा अकबर, सलीम आणि अनारकली ही कॅरेक्टर्स आपली जुनी ऐतिहासिक भाषा सोडून आगरी भाषेत बोलणार आहेत. यातले कलाकारही तसेच हटके आहेत. पण नाटकात विडंबन असलं तरी या नाटकातलं प्रत्येक कॅरेक्टर सद्यपरिस्थितीवर भाष्य करतं. आयपीएल आणि इलेक्शनचा माहोल असला तरी ही ऐतिहासिक आगरी कॉमेडी रसिकांना नक्कीच आवडेल असा यातल्या कलाकारांचा विश्वास आहे.

close