राज्यात 22 जिल्हे भीषण दुष्काळाच्या छायेत

July 2, 2014 7:54 PM0 commentsViews: 1366

Drought

02  जुलै :  यंदाच्या वर्षी पावसाने अंतर दिल्यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. राज्यातले 22 जिल्हे अजूनही भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या बैठकीत राज्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्यात 22 जिल्हे दुष्काळाच्या छायेत

- सांगली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांहून कमी पाऊस
– 16 जिल्ह्यांमध्ये 0 ते 25 टक्के पाऊस
– 16 जिल्ह्यांमध्ये 25 ते 50 टक्के पाऊस
– सध्या 1464 टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू
– 30 जूनपर्यंत 58.50 मिमी म्हणजेच सरासरीच्या 26.30 टक्के पाऊस

या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागात टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्या मंत्रिमंडळाचज्या बैठकीच घेण्यात आलाय. या टँकरची बिलं वेळेवर देण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. टंचाईवरील सर्व उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्याचा ही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

जिथं आवश्यकता आहे, तिथं टँकरनं तातडीनं पाणीपुरवठा करण्याच्या सूचना सरकारनं सर्व तहसीलदारांना दिल्यात. पाण्याचे सगळे साठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातली पीक परिस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे.

– ऊसाची 13 टक्के पेरणी
– ऊसाव्यतिरिक्त 6 टक्के क्षेत्रात पेरणी
– कापसाची पेरणी 16 टक्के
– सोयाबीनचे पेरणी 4 टक्के
– खरीपातली ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग या पिकांची पेरणी रखडलीये

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close