दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यातल्या 141 मतदारसंघात मतदानाला सुरुवात

April 23, 2009 8:01 AM0 commentsViews: 10

23 एप्रिल पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला देशभरातल्या 141 मतदारसंघातून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मिळून 25 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. या दुसर्‍या टप्प्यातल्या मतदानासाठी देशभरातून 2 हजार 41 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रसचे सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले भाजपचे आघाडीचे नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचं भवितव्य आज व्होटिंग मशिन्समध्ये बंद होईल. देशात मणिपूर, आंध्रपदेश, आसाम, बिहार, गोवा, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये मतदान सुरु आहे. अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे राहूल गांधी यांच्या समोर भाजप आणि बसपचंही आव्हान आहे.राजीव गांधीचा मतदारसंघ असलेल्या अमेठीवर काँग्रेसचा पंरपरागत गढ मानला जातो. ओरिसामध्येही मतदान शांततेत सुरु आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सकाळीच मतदान केलं. ओरिसामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही मतदान होत आहे. दुसर्‍या टप्प्यातील मतदानदेशभरातले मतदारसंघ : 141महाराष्ट्र : 25 उत्तर महाराष्ट्र : 6 – नंदूरबार, धुळे, जळगाव रावेर, दिंडोरी, नाशिक मराठवाडा : 5- औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर पश्चिम महाराष्ट्र : 12- पुणे, मावळ, बारामती, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगलेकोकण : 2 रायगड , रत्नागिरी-सिंधुदुर्गदेशभरातले मतदार : 19 कोटी 48 लाख 31,984उमेदवार : 2041महिला उमेदवार : 121 पक्ष : 166मतदान केंद्र : 2,23,320इव्हीएम मशीन्स : 3,50,879निवडणूक कर्मचारी : जवळपास 10 लाख

close