सुसाट, ताशी 160 किमी वेगाने धावली भारताची सेमी बुलेट ट्रेन !

July 3, 2014 5:02 PM0 commentsViews: 4064

indian bullet train03 जुलै : धावणार धावणार..भारतातही बुलेट ट्रेन धावणार हे स्वप्न आता काही पावलं आता दूर आहे. आज (गुरुवारी) सकाळी दिल्ली ते आग्रा मार्गावर पहिल्यांदाच बुलेट ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ताशी 150 किमी वेगानं धावणार्‍या या ट्रेननं आग्रा ते दिल्ली हे अंतर अवघ्या 90 ते 100 मिनिटांमध्ये पार केलं. सेमी हाय स्पीड प्रकराची ही ट्रेन आहे. आजची ही चाचणी यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेच वातवरण आहे.

सिग्नल आणि इतर यंत्रणांची चाचणी यावेळी घेण्यात आली. या ट्रेनसाठी जपानचीही मदत घेण्यात आलीे आहे. ताशी 160 किलोमीटर ही या ट्रेनच्या वेगाची कमाल मर्यादा आहे. सध्या या मार्गावर रेल्वेची कमाल मर्यादा ही ताशी  140 किमी इतकी आहे. पण सर्व रेल्वे या 90 ते 100 या वेगानेच धावत असतात. पण आज या बुलेट ट्रेनने 160 किलोमिटर प्रतितास या वेगाने धावली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close