पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणाचा 7 जुलैला फैसला

July 3, 2014 6:29 PM1 commentViews: 703

121pallavi purkayastha03 जुलै : पल्लवी पुरकायस्थ खून प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 7 जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. 7 जुलैला दोषी सज्जाद पठाणला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

खून, विनयभंग आणि जबरदस्तीने घरात घुसणे या गुन्ह्यांसाठी सज्जाद पठाणला सेशन्स कोर्टाने सोमवारी दोषी ठरवलेलं आहे. या प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली. आज निकाल येणे अपेक्षित होता मात्र कोर्टाने या प्रकरणाची 7 जुलैला सुनावणी केली जाईल असं स्पष्ट केलं.

9 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील वडाळा इथं राहणार्‍या पल्लवीची राहत्या घरी हत्या झाली होती. इमारतीचा वॉचमन सज्जाद अहमद पठाणने पल्लवीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण पल्लवीने प्रतिकार केल्यामुळे पठाणने तिची हत्या केली होती. दोषी सज्जाद पठाणला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पल्लवीच्या कुटुंबीयांनी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Prachi Babdu

  ९ ऑगस्ट २०१२ ला हत्या झाली
  आणि
  दोषी ला शिक्षा होणार ७ जुलै २०१४ रोजी.
  म्हणजे तब्बल २ वर्षे लागली या प्रकरणात न्याय मिळायला..

  अतिशय दिरंगाईयुक्त आणि अकार्यक्षम कारभार आहे आपल्याकडील न्यायव्यवस्थेचा. २ वर्षे पोलिस आणि या प्रकरणामधील वकील/न्यायाधीश काय करत होते याचा देखील खुलासा व्हायला हवा.. कोणी मंत्री/अधिकारी गुंतले होते का इतका वेळ घालवायला? एका सुरक्षारक्षकाला पकडून फाशी द्यायला २४ महिने घालवले या सुस्त यंत्रणेने… सनी देओल ची आठवण झाली — “तारीख पार तारीख मिलती रही है माय लॉर्ड”

close