आता बस्स ; युती तोडा, स्वबळावर लढू !

July 3, 2014 11:48 PM0 commentsViews: 5360

Image img_193182_senabjp_240x180.jpg03 जुलै : लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्येही भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवावी अशी स्वप्नं आता पक्षाच्या पदाधिकार्‍यांना पडू लागली आहे. राष्ट्र जिंकले आपण महाराष्ट्र जिंकणार आपणच. यात आपणच अर्थ म्हणजे भाजपच आहे. आताही तीन पायाची शर्यत थांबवा. काळाची गरज म्हणून आतापर्यंत प्रत्येकवेळी आपण तडजोड करत होतो. पण आता बसं झालं अशी मागणी भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी केली.

मुंबईमध्ये अंधेरीच्या क्रीडा संकुलवर भरलेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकार्‍यांनी स्वबळाची इच्छा बोलून दाखवली. अनेक वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी तडजोडीचं राजकारण केलंय. आता केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपने इतकं मजबूत व्हावं की शिवसेनेची गरजच पडू नये असा सूरही पदाधिकार्‍यांनी लगावला.

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या पदाधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. शिवसेनाही आपल्या सुख दुखात अनेक वेळा सहभागी झाली. ही युती थोडी थोडकी नाहीतर 25 वर्षांची आहे ती असं म्हणून तोडता येणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close