हुंडाविरोधी कायदा महिलांचे कवच नव्हे, शस्त्र म्हणून वापर :कोर्ट

July 3, 2014 7:30 PM0 commentsViews: 474

SUPREME_COURT3f03 जुलै : हुंडा घेऊ नये यासाठी कायदा करण्यात आला या कायद्याअंतर्गत अनेकांवर कारवाई झाली पण याच कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केलीय. अशा घटनांमधल्या आरोपींना कोणत्याही पुराव्याशिवाय तात्काळ अटक होऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

498-A हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याचा महिलांकडून वापर संरक्षणाचं कवच म्हणून वापरण्याऐवजी शस्त्र म्हणून केला जातोय. पती आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा वापर करून त्यांना अटक होईल हा हेतू यात असतो. अनेक घटनांमध्ये नवर्‍याचे अंथरुणाला खिळलेले आजी-आजोबा, अनेक वर्षं परदेशात राहणार्‍या बहिणींनाही अटक केली गेलीय, असं मतही सुप्रीम कोर्टाने नमूद केलंय.

सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणातल्या आरोपींना पोलिसांकडून तात्काळ अटक केली जाते या प्रवृत्तीवर ताशेरे ओढले. हे बदला घेण्याच्या वृत्तीतून होतात असंही कोर्टाने स्पष्ट केलं. अशा प्रकरणांमध्ये पोलीस तात्काळ आरोपीला अटक करणार नाहीत, याकडे लक्ष ठेवण्याचे राज्य सरकारांना सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहे.

ज्या प्रकरणांमध्ये अशी अटक होईल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस अधिकार्‍यांना अटकेची कारणं मॅजिस्ट्रेटला द्यावी लागतील, असं न्यायमूर्ती सी के प्रसाद यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलंय. हुंडाविरोधी कायदा 498-A या कलमाखाली सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूद करण्यात आली.

हुंडाविरोधी कायद्याचा गैरवापर

1) कायद्याच्या गैरवापराबद्दल सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता
2) आरोपींना कोणत्याही पुराव्याशिवाय तात्काळ अटक करू नये
3) हुंडाविरोधी कायद्यात 498-A कलम लागू होतं
4) हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे
5) या कायद्याचा वापर शस्त्र म्हणून होतो
6) पती आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग
7) पोलिसांनी तात्काळ अशा आरोपींना अटक करू नये
8) अटक झाल्यास अटकेची कारणं मॅजिस्ट्रेटना सांगावी लागणार
9) योग्य कारणाशिवाय अशा प्रकरणात अटक न करण्याचे पोलिसांना कोर्टाचे निर्देश

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close