जळगावमधले आदिवासी मतदानाच्या बहिष्कारावर ठाम

April 23, 2009 9:20 AM0 commentsViews: 3

23 एप्रिल, सातपुडा जळगाव जिल्ह्यातल्या सातपुडा भागातल्या आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकला असून सकाळपासून आदिवासींनी मतदान केलेलं नाही. ते बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहेत. हा निर्णय आदिवासींनी मागे घ्यावा, याकरता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि लोक संघर्ष मोर्चा यांच्यातली बोलणी अपयशी ठरली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात जवळपास तीस हजार आदिवासी आहेत. मतदानासाठी उभे राहिलेल्या उमेदवारांनीही सकाळी मतदानाला सुरुवात केली. जगळगावमध्ये 40.8 डिग्री सेल्सिअस तापमानमुळे नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह कमी झाला आहे.

close