सावित्रीबाईंचं नाव विद्यापीठाला देण्यास एका ज्येष्ठ मंत्र्यांचा विरोध-भुजबळ

July 3, 2014 10:46 PM0 commentsViews: 1880

 03 जुलै : पुणे विद्यापीठाच्या नामांतरावरून राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव न भांडता सरकारनं द्यावं अशी मागणी भुजबळांनी केलीय. नामांतराच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही झालेली आहे. एवढंच नाहीतर हा प्रस्ताव कॅबिनेटच्यासमोर आणण्याची प्रक्रियाही पूर्ण झालीय. फक्त हा विषय चर्चेत घ्यायचा आणि निर्णय द्यायचा एवढंच बाकी आहे. पण तरीही काही ज्येष्ठ मंत्री निर्णयात अडथळे आणत आहे, हे कोण मंत्री आहेत त्यांचं नाव सांगण्याची गरज नाही असा आरोपही भुजबळांनी केलाय. तसंच शरद पवार यांनी या निर्णयाला होकार दिलाय याबाबत माझी त्यांच्यासोबत चर्चाही झाली. पण तरीही यावर वाद होतोय हे दुर्देव म्हणावे लागले असंही भुजबळ म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close