चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी तर कोलकाता नाईट रायडरचा राजस्थान रॉयल्सशी

April 23, 2009 10:07 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी होणार आहे. तर कोलकाता नाईट रायडरची राजस्थान रॉयल्सशी आमने सामने होणार आहे. या मॅचेस भारतीय वेळेनुसार दुपारी 4 आणि रात्री 8 वाजता होणार आहेत. या मॅचेस डर्बन आणि केपटाऊन इथे खेळल्या जाणार आहेत. डेक्कन चार्जर्स 4 पॉइण्टस् मिळवून पहिल्या क्रमांकावर आहेत. 3 पॉइण्टस् मिळवून मंुबई इंडियन दुसर्‍या क्रमांकावर आहेत. 2 पॉइण्ट मिळवून डेअर डेविल तिसर्‍या क्रमांकावर आहे. 2 पॉइण्ट मिळवून चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. 2 पॉइण्ट मिळवून बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स पाचव्या क्रमांकावर आहे. 2 पॉइण्ट मिळवून कोलकाता नाईट रायडर सहाव्या क्रमांकावर आहे. 1 पॉइण्ट मिळवून राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आहे. तर 0 पॉइण्टस् मिळवून पंजाब किंग्ज 11 आठव्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर आहे. या आठ टीम्समधली चढाओढ पाहता आयपीएलच्या दुसर्‍या हंगामातल्या मॅचेस रंगतदार होणार असल्याचं दिसून येतंय.

close