संपकरी डॉक्टरांना मेस्माच्या नोटिसा

July 3, 2014 11:04 PM0 commentsViews: 193

doctor_strik03 जुलै : राज्यातील राजपत्रित 12 हजार डॉक्टर संपावर गेले असून संपाचा आज तिसरा दिवस आहे. मंगळवारपासून या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. यामुळे रुग्णांचे हाल होत असल्यामुळे अखेर सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.

सरकारने संपकरी डॉक्टरांना मेस्मांतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. पण, आझाद मैदानात या नोटिसांची होळी करण्यात आली. मागण्या मान्य होत नाही तोवर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी राज्यभरातील डॉक्टरांनी अचानक संप पुकारल्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फटका बसलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close