पावसात मोबाईल भिजला तर…

July 3, 2014 11:18 PM1 commentViews: 13707

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे,सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

मोबाईल पाण्यात पडणं किंवा पावसात भिजणं म्हणजे मोठं संकट. आपल्या सगळ्याच गोष्टी या मोबाईलमध्ये असतात. अशा वेळी काय करायचं…

या काही टिप्स

सगळ्यात आधी फोन पाण्यातून काढा..फोन जितका जास्त वेळ पाण्यात राहील तितका तो निकामी होण्याची भीती जास्त. हेडफोन्स जॅक, यूएसबी पोर्ट, मेमरी स्लॉट यातून पाणी आत जाण्याची शक्यता जास्त आहे.

फोन पाण्यातून काढल्या काढल्या हातावर झटकून, बटणं दाबून तो चालतोय का ते पाहण्याचा मोह टाळा

लगेच फोन ऑन केलात तर कोणतं तरी सर्किट शॉर्ट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. असं झालं तर फोन कायमचा गेलाच.

पाण्यात पडूनही किंवा ओला होऊनही फोन सुरू असेल तर तो आधी स्विच ऑफ करा.

आता फोन टिश्यू पेपरवर किंवा टॉवेलवर ठेवून त्याचे सुटे होणारे एक एक भाग काढा – फोन केस / कव्हर बॅक कव्हर, बॅटरी, सीमकार्ड / कार्ड्स, मेमरी कार्ड या सगळ्या गोष्टी हळुवार हाताने पुसून घ्या. हे सगळं करताना फोन गदागदा हलणार नाही, उलटापालटा होणार नाही याची काळजी घ्या. कारण जितका फोन हलेल तितकं पाणी आत जाईल. कदाचित जिथे आतापर्यंत नव्हतं, तिथेही जाईल.

phone_rainएकदम सॉफ्ट टिश्यू पेपर वापरू नका… कारण या टिश्यूचा ओला झाल्यावर लवकर तुकडा पडेल किंवा कशात तरी अडकेल.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट…ओल्या फोनवर किंवा कोणत्याही गॅजेटवर ती सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर वापरू नका.
ड्रायर हवा ब्लो करतो… त्यामुळे पाणी अधिकाधिक आत जातं… अगदी कोल्ड सेटिंगवरही हेअर ड्रायर वापरू नका.

शक्य असेल तर व्हॅक्यूम क्लिनर वापरा. व्हॅक्यूम क्लिनर हवा ओढून घेतो. त्यामुळे आत गेलेलं पाणी बाहेर ओढायला मदत होईल.

फोनमध्ये गेलेलं पाणी शोषून घ्यायचे काही सोपे उपाय.

एखाद्या लहान बरणीत किंवा झिप लॉक बॅगमध्ये तांदूळ घ्या आणि त्यात तुमचा मोबाईल पूर्ण बुडेल असा खुपसून ठेवा. (वाचायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे.) तांदूळ तुमच्या फोनमधलं सगळं पाणी शोषून घेतील. पण यासाठी किमान काही तास तरी मोबाईल तांदळांमध्ये खुपसून ठेवावा लागेल.

44mobile_blogदुसरा पर्याय सिलिका जेलचा. फोन झिप लॉकच्या बॅगमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत सिलिका जेलची पुडी ठेवून बॅग सील करा. नवीन लेदर शूज, पर्स, थर्मास फ्लास्क यांच्यासोबत ही सिलिका जेलची पुडी मिळते, ती वापरता येईल.

या दोन्ही गोष्टी केल्यावरही थोडा वेळ फोन पेपर टॉवेल्स किंवा टॉवेल्सवर राहू देत.

फोनचे बाहेरून दिसणार सगळे भाग कोरडे झाले आहेत, याची खात्री झाल्यानंतरच मग फोन ऑन करायचा प्रयत्न करा. फोन जर खूप भिजला असेल तर तो हे सगळे सोपस्कार करून ऑन करेपर्यंत साधारण 24 तास जाऊद्यात.

फोन ऑन करताना डिस्प्ले स्क्रीनवर काही विचित्र येतंय का, काही आवाज येतोय का याकडे लक्ष द्या.

फोन ऑन होत नसेल तर थोडा वेळ थांबा, पण थेट चार्जरला लावू नका.

हे सगळं करूनही फोन ऑन झाला नाही तर मात्र तुम्हाला सर्व्हिस सेंटरकडे धाव घ्यावी लागेल.


+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jadhav

    पावसा मला प्लीज भिजव.

close