वारकर्‍यांवर काळाचा घाला, दिंडीत कार घुसली; महिलेचा मृत्यू

July 3, 2014 11:36 PM0 commentsViews: 2370

wari_accident03 जुलै : आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकर्‍यांवर काळाने घाला घातल्याची दुर्देवी घटना घडलीय. पंढरपूर-शेटफळ मार्गावर वारकर्‍यांच्या दिंडीत एक कार घुसली.

कार घुसल्याने एका महिला वारकर्‍याचा मृत्यू झालाय तर चार वारकरी गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इंदुमती धोत्रे असं या मृत महिलेचं नाव आहे. अमरावतीवरुन निघालेल्या दिंडीत इंदुमती धोत्रे सहभागी झाल्या होत्या. या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

पंढरपूर-शेटफळ मार्गावर गणेश ढाब्याजवळ हा अपघात झाला. एक ट्रक शेटफळकडे चालला होता. त्याचवेळी मराठवाड्याकडून पंढरपूरकडे चाललेली कार दोघांची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर मारुती कार रस्त्याच्या कडेला चाललेल्या दिंडीत घुसली. त्यामुळे हा अपघात झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close