कोलकाता नाईट रायडर्समधले वाद कायम

April 23, 2009 12:29 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल कोलकाता नाईट राइडर्सने किंग्ज 11 पंजाब विरूद्ध आयपीएल स्पर्धेच्या दुसर्‍या सिझनमधला आपला पहिला विजय मिळवला. त्याची पार्टीही त्यांनी दणक्यात केली. पण तरीही टीम आणि टीम व्यवस्थापनातले अंतर्गत वाद अजून मिटलेले नाहीत.या विजयानंतर कोलकत्यात जल्लोष झाला असेल. नाईट रायडर्सचा कॅप्टन म्हणून सौरव गांगुलीला पायउतार व्हावं लागलं. पण त्याला कमबॅकचा राजा का म्हणतात हे त्याच्या या कामगिरीवरून सगळ्यांना नक्कीच पटलं असेल. बॅटिंगमध्ये तो फ्लॉप झाला असला तरी कठीण परिस्थितीत त्यानं एका ओव्हारमध्ये दोन विकेट घेतल्या आणि टीमला विजयाचा मार्ग दाखवला आहे.ख्रिस गेलनं फटकेबाजी करत टीमला विजय मिळवून दिला आणि शाहरूख खानही त्यावर खुष होता पण मैदानाबाहेर कुरबुरी सुरूच आहेत. एकापेक्षा अधिक कॅप्टनची संकल्पना अजूनही सगळ्यांना रुचलेली नाही.कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा विजय तर साजरा केला. पण कोलकातावासीयांची मनं जिंकण्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल याची किंग खानला पूर्ण कल्पना आहे. सध्या कोलकाता नाईट रायडर्सचं टीमसिलेक्शनही वादाचा विषय ठरतोय. जिथे स्पिनर्सची चलती आहे तिथे अजंता मेंडिसला डगआऊटमध्ये बसलेला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. एकंदरीतच टीमच्या विजयाबरोबर टीमचे वादही जोरदार सुरू आहेत.

close