21×27 फुटाची भव्य पिशवी

July 4, 2014 2:09 PM0 commentsViews: 678

04  जुलै :  ठाण्यात राहणार्‍या कलाकार मनीषा ओगले यांनी चक्क 21 x 27 फुटाची पिशवी बनवली आहे. या भव्य पिशवीची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं घेतली आहे. ओगले यांनी ही पिशवी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अवघ्या 9 तासात बनवली होती. प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि पाणी वाचवा हा संदेश देण्यासाठी ओगले यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये ही पिशवी सध्या पहायला मिळते. या आधी त्यांनी 40 x 20 फुटाचा भव्य कुर्ता बनवला होता, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close