इराकमधून सर्व 46 नर्सेसची सुखरूप सुटका

July 4, 2014 4:01 PM0 commentsViews: 1959

iraq_nurses04 जुलै : इराकमध्ये अडकलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आली आहे. इराकमधील तिकरीतून या नर्सेसना एअरपोर्टवर पोहचवण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेनं याबाबतची माहिती दिली आहे. आयसीस या संघटनेनं भारतीय नर्सेसचं अपहरण केलं होतं. आज या सर्व 46 नर्सेसची सुटका झालीय. आज या नर्सेस इरबिलमध्ये राहतील.

संध्याकाळी त्यांना आणण्यासाठी दिल्लीहून विशेष विमानाने इरबिलला रवाना होईल. इरबिलमधून त्याना थेट कोच्चीला आणलं जाईल. या विमानामध्ये केरळ सरकार आणि केंद्र सरकारचा एक-एक प्रतिनिधी असणार आहे. हे विमान इरबिलमधून मध्यरात्री 12 च्या सुमारास भारताकडे रवाना होईल. गुरुवारी आयसीसच्या दहशतवाद्यांनी तिकरीच्या हॉस्पिटलमधून या 46 नर्सेसला ताब्यात घेतलं होतं.

यात 5 बांगलादेशी नर्सेसचाही सहभाग आहे. 10 जून रोजी दहशतवाद्यांनी तिकरीत कब्जा केला होता. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये या नर्सेस अडकून पडल्या होत्या. आपल्याच हॉस्पिटलमध्ये या नर्सेस कैद झाल्या होत्या. काल गुरुवारी या नर्सेसना दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. पण आज या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close