महागाईला साठेबाजी जबाबदार -जेटली

July 4, 2014 4:22 PM0 commentsViews: 597

11arun_jetly3404 जुलै : ज्या वस्तुंची किंमती वाढते त्या वस्तुंची साठवणूक केली जाते हे दुर्देवी असून अशा साठेबाजांना कसं रोखता येईल हे सरकारपुढे आव्हान आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं.

जेटली यांनी आज (शुक्रवारी) सगळ्या राज्यांच्या अन्नपुरवठा मंत्र्यांची बैठक घेतली. यामध्ये साठेबाजीच्या मुद्यावर भर देण्यात आला. देशभरात दुष्काळाची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे आता सर्रास साठेबाजीला ऊत येणार आहे.

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पास्वान यांनी तर साठेबाजी हे देशविरोधी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. धान्याचा काळा बाजार आणि साठेबाजी हे अन्नधान्याच्या किंमती वाढण्याला कारणीभूत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्य सरकारांनी जीवनावश्यक वस्तू कायद्याचा उपयोग करून महागाईवर नियंत्रण ठेवता येईल अशी माहितीही पासवान यांनी दिली. अलीकडे साठेबाजी रोखण्यासाठीच कांदा आणि बटाट्याचा समावेश सरकारने जीवनाश्यक वस्तू कायद्याअंतर्गत केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close