टीमसाठी प्रीतीने वापरला बीच क्रिकेटचा अनोखा फॉर्म्युला

April 23, 2009 1:23 PM0 commentsViews: 2

23 एप्रिल किंग्ज 11 पंजाबच्या टीमला पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. टीमचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी टीमची मालक प्रीती झिंटाने बीच क्रिकेटचा अनोखा फॉर्म्युला वापरलाय. तिने चक्क युवराजसह टीममधील खेळाडूंसोबत बीच क्रिकेट एन्जॉय केलं. टीमसह बीच क्रिकेट हा प्रीतीचा अनोखा फंडा खेळाडूंनीही एन्जॉय केला.बीच क्रिकेटच्या याच अनोख्या फंड्याबाबत प्रीतीझिंटाला विचारलं असता युवराजकडून बीच क्रिकेटच्या टिप्स घेतल्याचं तिने सांगितलं. टीमसह बीच क्रिकेट खेळण्याचा अनुभव ग्रेट असून हा अनोखा फंडा खूप एन्जॉय केल्याचं म्हटलं आहे. टीमला रिचार्ज करायला बीच क्रिकेटचा खू्‌प फायदा झाल्याचंही तिने यावेळी सांगितलं.

close