‘ही युती तुटायची नाय !’

July 4, 2014 6:06 PM0 commentsViews: 1685

67sena04 जुलै : युतीत आजपर्यंत आपण तडजोड करत आलोत आता बस्स झालं, युती तोडून टाका आणि स्वबळावर लढा असा नारा भाजपच्या नेत्यांनी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली पण भाजपच्या शिलेदारांनी सबुरीचा सल्ला देत युती तुटणार नाही असं आश्वासन दिलं. पण यावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र शिवसेनेनंही युती अभेद्य असल्याचा निर्वाळा दिलाय.

कुणी काही म्हटलं म्हणून युती तुटणार नाही. भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी अशा दिग्गज नेत्यांनी ही युती बनवली आहे. आज कुणी उठलं आणि युती तोडा असं म्हटलं तर तुटणार नाही.

अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. युती अभेद्य असून विधानसभेला एकत्र सामोर जाऊ असं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच आमच्याही शिबिरात अशा मागण्या होत असतात पण त्याचं एवढं गांभिर्याने घेण्याची गरज नाही असंही राऊत म्हणाले. तर भाजप 288 जागेसाठी तयारी करत आहे पण याचा अर्थ असा नाही की, भाजप स्वबळावर लढणार आम्ही मित्रपक्षाला सोबत घेऊनच विधानसभेला सामोरं जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close